Saturday, July 27, 2024
Homeनगरकुरियर पाठविण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

कुरियर पाठविण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कुरियर कुठपर्यंत आले आहे, त्याचे लोकेशन सांगतो, असे सांगून महिलेची 2 लाख 89 हजार 991 रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

केडगाव उपनगरातील एका महिलेने कोतवाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, 24 ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घरी असताना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मी नंदन कुरीयर कंपनीतून बोलत आहे. तुम्ही ऑर्डर केलेले आयुर्वेदिक औषधाचे पार्सल ट्रॅकिंग केले का? असे तो म्हणाला. त्यास हो असे सांगितले.

त्यानंतर त्या व्यक्तीने मी तुमचे आयुर्वेदिक औषधाचे कुरीयर कुठपर्यंत आले आहे. त्याचे लोकेशन सांगतो. मी तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवतो, तो ओटीपी तुम्ही मला सांगा, असे सांगितल्याने त्यास विश्वास ठेवला. त्या व्यक्तीला ओटीपी सांगितला. त्यानंतर दोन हजार रूपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर लागोपाठ सात वेळा 25 हजार रूपये काढल्याचा मेसेज आला. नंतर 15 हजार, दहा हजार व 89 हजार 989 रूपये काढल्याचा मेसेज आला. खात्या पैसे काढल्याचे लक्षात आल्यानंतर सदरचे बँक खाते बंद करून पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या