Friday, April 25, 2025
Homeक्राईमCourt Verdict : दुहेरी खून खटल्यात सख्खे चुलतभाऊ दोषी; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Court Verdict : दुहेरी खून खटल्यात सख्खे चुलतभाऊ दोषी; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

उगाव । वार्ताहर Ugaon

पिंपळगाव बसवंत येथील पुंडलिक शिंदे व माणिक शिंदे या पिता-पुत्राच्या खून खटल्यात अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल (पिंपळगाव बसवंत) या दोन सख्खे चुलतभावांना दोषी ठरवण्यात येऊन निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी. पवार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

पिंपळगाव बसवंत येथील अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल यांना रेणुका मंदिराच्या आवारात येऊन दारू, गांजा पिऊन गोंगाट करू नका, असे समजावून सांगणार्‍या माणिक शिंदे यास शिवीगाळ करण्यात येऊन तुला पाहून घेऊ, अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 1 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास माणिक शिंदे हा पारावर बसलेला असताना अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल या दोघा भावांनी माणिक शिंदे यास मारहाण सुरू केली होती.

Country Desk : गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी “कंट्री डेस्क” – मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय

सदर घटना माणिकचे वडील पुंडलिक शिंदे यांनी पाहिल्यावर मुलाला सोडवण्यासाठी गेले तेव्हा अजय धाडीवालने माणिक शिंदे यास आज संपवून टाकेल, असे म्हणत मानेवर व पाठीवर चाकू मारला. त्यावेळी माणिक खाली पडला. विकास धाडीवाल हा पुंडलिक शिंदे यास मारहाण करत होता. त्याला लोटून माणिक यास वाचवण्यासाठी गेलेले वडील पुंडलिक शिंदे यांच्यावरही अजय धाडीवालने पोटात व मांडीवर चाकू मारला होता. इतर नागरिक त्या ठिकाणी जमा झाल्यावर दोघेही संशयित पळून गेले होते.

World Chess Championship -2024 : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश विश्वविजेता

जखमी शिंदे पिता-पुत्रास वैद्यकीय उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा पुंडलिक शिंदे यांच्या जबाबावरून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येऊन अटक करण्यात आली होती.

KumbhMela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास व्हावा – डॉ. प्रवीण गेडाम

उपचारादरम्यान माणिक शिंदे व पुंडलिक शिंदे या पिता-पुत्राचे निधन झाले. तपासाअंती आरोपपत्र निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. एस. पी. बंगले यांनी सरकार पक्षाच्या वतीने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे यांच्यासह एकूण 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवली व प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी पोलीस अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.जी. शिरोळे यांनी काम पाहिले.

कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, राज कपूर चित्रपट महोत्सवासाठी दिले निमंत्रण

न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून आरोपी अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल या दोघा सख्ख्या चुलतभावांना दोषी ठरवण्यात आले. दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा न्यायाधीश बी. डी. पवार यांनी सुनावली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...