Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशCOVID-19 : देशातील रुग्ण संख्येत मोठी घट

COVID-19 : देशातील रुग्ण संख्येत मोठी घट

दिल्ली | Delhi

देशात दर दिवशी नव्यानं नोंद होणाऱ्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाल्याची बाब स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत मृतांचा आकडा कमी झाला आहे. जी फारच दिलासादायक बाब आहे. तसेच आणखी एक चांगली बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशभरात १७ हजार १७० जण करोनामुक्त झाले. तर, १५ हजार १४४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली व १८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ५ लाख ५७ हजार ९८५ झाली आहे. तर, सध्या देशात २ लाख ८ हजार ८२६ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १ कोटी १ लाख ९६ हजार ८८५ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय, आतापर्यंत १ लाख ५२ हजार २७४ रुग्णांना करोनामुळे जीव गमावावा लागलेला आहे.

दरम्यान, देशात कालपासून करोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी देशातील १ लाख ९१ हजार १८१ नागरिकांना लसचा पहिला डोस दिला. लसचा दुसरा डोस घेण्यासाठी या सर्वांना २८ दिवसांनंतर पुन्हा लसीकरण केंद्रावर यावे लागणार आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी को-विन अॅपवर माहितीची नोंदणी करताना काही केंद्रावर तांत्रिक अडचणी आल्या. माहिती अपलोड होण्यास वेळ लागत होता. या तांत्रिक समस्या तंत्रज्ञांच्या मदतीने दूर करण्यात आल्या. पहिल्या दिवशी काही केंद्रांवर लसीकरण मोहीम उशिरा सुरू झाली. संध्याकाळी उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार देशातील १ लाख ९१ हजार १८१ नागरिकांना लसचा पहिला डोस देण्यात आला. याआधी संध्याकाळी साडेपाच पर्यंत देशातील १ लाख ६५ हजार ७१४ जणांना लस डोस पहिला डोस दिल्याचे जाहीर करण्यात आले. उशिरापर्यंत सुरू असलेल्या कामामुळे दिवस संपेपर्यंत १ लाख ९१ हजार १८१ नागरिकांना लसचा पहिला डोस देण्यात आला.

भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश यांना पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसचा पुरवठा करण्यात आला आहे. देशातील १२ राज्यांमध्ये कोविशिल्डसह भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन या लसचा पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्या व्यक्तीला कोणती लस दिली जाणार या संदर्भात निवड करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना सध्या उपलब्ध नाही. कोट्यवधी नागरिकांना लस देण्याचे आव्हान असल्यामुळे दोन कंपन्यांच्या सहकार्याने लसच्या मागणीची पूर्तता सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या