Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - अजित पवार

करोना नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) –

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने  डोके वर  काढले काढले आहे. दिवसाला नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५०० च्या                                             

- Advertisement -

वर गेली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये पुणे शहरातील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान,जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठीनागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्रीअजित पवार यांनी आज दिले. पुणे जिल्ह्यातील आणि शहरातील आटोक्यात आणण्यासाठी आजपासून लागू केलेले निर्बंध १५ दिवस लागू राहतील. त्यानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

येथीलविधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातीललोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावाबैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रयभरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्यामहापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चंद्रकांतपाटील, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार सिद्धार्थशिरोळे यांच्यासह

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ‘यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार,पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीसआयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. प्रदीप आवटे आदींसह वरिष्ठअधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यातयेणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहितीघेतली. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाअधिकाऱ्यांना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात बाधितांचीसंख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारीयेत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्येपूर्ण क्षमतेचा वापर करुन चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षणकरा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गृह विलगीकरणातील नागरिकांशी संपर्क व समन्वयठेवावा. गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळेअशावेळी कठोर कारवाई करावी, तसेच गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तताहोत असेल तरच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गर्दीच्या व सार्वजनिकठिकाणी पथकांची नेमणूक करावी. कुठेही गर्दी होता कामा नये. मास्क न वापरणाऱ्यांवर वेळीचदंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.

काय असतील निर्बंध?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद

वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररी पन्नास टक्के क्षमतेनूसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरात हॉटेल १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आसनक्षमेच्या ५० टक्के लोकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तर होम डिलीव्हरी ११ वाजेपर्यंत करता येणार आहे. थिएटर, मॉल्स आणि दुकानांनाही रात्री दहावाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रात्रीची संचारबंदी

राज्यात सगळीकडे पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे यावर आळा घालण्यासाठी प्रशानसनाने रात्री अकरा ते पहाटे पाचवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लग्न समारंभारत ५० टक्के लोकांनाच परवानगी

लग्न समारंभ, धार्मिक विधी, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी तसेच दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील उद्याने फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या व्यक्ती हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सौरभ राव म्हणाले.

राज्य लोकसेवा आयोग कमी पडला

विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) कमी पडला आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमपीएससीच्या प्रश्नात राजकारण आणण्याची गरज नाही. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे. सरकार काहीतरी वेगळे करत आहे, असे भासवण्याचा काहींनी प्रयत्न झाला. त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो असून, त्यांनी स्वतः सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने वातावरण खराब करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -

ताज्या बातम्या