नाशिकरोड । Nashik
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना कोविडची आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
- Advertisement -
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना प्रवासापूर्वी 72 तास आधी कोविडची चाचणी करुन हा रिपोर्ट सोबत ठेवावा लागणार आहे.
गाडी क्रमांक 02780 हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा, गाडी क्रमांक 02630 हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर, गाडी क्रमांक 06528 न्यू दिल्ली-बेंगलोर, गाडी क्रमांक 06524 हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर, गाडी क्रमांक 09302 डॉ. आंबेडकर नगर-यशवंतपुर या गाडीने प्रवास करणा-या प्रवाशांना हा टेस्ट रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन गैरसोय टाळावी.