Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशजानेवारीत मिळेल करोना लस

जानेवारीत मिळेल करोना लस

नवी दिल्ली –

सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्यास करोनावरची लस 2021 च्या जानेवारी महिन्यापर्यंत येण्याची

- Advertisement -

शक्यता आहे पण त्यासोबत काही आव्हानांचाही सामना आपल्याला करावा लागेल असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. मात्र लस आल्यानंतर सुरुवातीला या लशीची कमतरता भासण्याची शक्यता आहे. आपल्या देशातील लोकसंख्या लक्षात घेता सुरुवातील सगळ्या वर्गांपर्यंत लस पोहचवता येईल की नाही याबाबतच्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यावं लागेल असंही मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रणदीप गुलेरिया यांना करोनावरची लस कधी येईल? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. सध्याच्या घडीला लस आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. जर सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या तर लस जानेवारी महिन्यापर्यंत येईल. मात्र सुरुवातीला लशीची कमतरता भासण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....