Friday, May 2, 2025
Homeधुळेगो तस्करांनी नाकेबंदी करणार्‍या पोलिसांच्या अंगावर घातले वाहन

गो तस्करांनी नाकेबंदी करणार्‍या पोलिसांच्या अंगावर घातले वाहन

धुळे Dhule । प्रतिनिधी

नरडाणा पोलिसांना हुलकावणी देवून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या गो-तस्करांना (Cow smugglers) अडविण्याचा प्रयत्न आझादनगर पोलिसांनी (police) केला. मात्र, मुजोर गो तस्करांनी थेट नाकेबंदी (blockade) करणार्‍या पोलिसांच्याच अंगावर वाहन घातले. यावेळी तस्कर आणि पोलिसांच्या वाहनांमध्ये मोठा अपघात झाला. यात वाहनांच्या नुकसानीसह पोलिसही जखमी झाले. मात्र, पोलिसांचे नशिब बलवत्तर म्हणून ते अपघातातून बचावले. अपघातानंतर तस्करांनी आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गो-तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

काल पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास अमळनेर ते बेटावद रस्त्याने कत्तलीसाठी गायी-म्हैशींची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती नरडाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महामार्गावर सापळा लावण्यात आला. संशयित झायलो वाहन (एम. एच. 48, एफ- 4717) दिसताच पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. सदर वाहन नरडाणा चौफुलीवर अडविण्यात आले. तेव्हा त्यातील तस्करांनी पोलिसांना बघताच वाहन सोडून पळ काढला. लागलीच गो-तस्करांना पळवून नेण्यासाठी एक इनोव्हा (एम. एच. 02 / बी.डी. 2428) तेथे आली. तस्करांना घेवून ती सुसाट वेगाने धुळ्याच्या दिशेने निघाली.

या कारवाईत नरडाणा पोलिसांना झायलो वाहनासह एक जर्शी जातीचा बैल, दोन म्हशींचे पारडू, दोन जर्शी गायीचे वासरू, एक म्हैस, एक मृत गाय असा मुद्देमाल घटनास्थळी मिळाला.

सोनगीर पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर इनोव्हा अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, 120- 130 कि.मी. प्रति तासच्या वेगात असलेली इनोव्हा तेथूनही निसटली. गोतस्कर सुसाट वेगाने निघालेले असल्याचे कळताच कुठलीही वेळ न दवडता आझादनगर पोलीस ठाण्याचे पोना. संदीप कढरे, पोकॉ. सिद्धांत मोरे आणि चालक संतोष घुगे हे आपल्या ताब्यातील वाहन एम. एच. 12/ एस. 3यू. 2016 घेऊन मुंबई-आग्रा महामार्गावर नाकेबंदीसाठी आले. त्यांनी बिलाडी चौफुलीजवळील सर्व्हिस रस्त्यावर आपले वाहन थांबविले. बरोबर त्याच रस्त्याने इनोव्हा अत्यंत वेगात आली. यावेळी पोलिसांनी गो-तस्करांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी इनोव्हा थेट पोलिसांच्या वाहनावरच धडकवली.

गो-तस्करांनी पोलिसांच्या बोलेरो वाहनाला दिलेली धडक अत्यंत जीवघेणी होती. या अपघातात चालक घुगेंच्या डोळ्याला इजा झाली, तर पोना. कढरे यांच्या डोक्याला व हातापायाला दुखापत झाली. तसेच मोरे यांनाही मुकामार लागला. पहाटे त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार झाले. तेथून नंतर सरकारी रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. जखमी पोलिसांची विचारपूस करण्यासाठी नरडाणाचे एपीआय चंद्रकांत पाटील हे स्वत: दवाखान्यात आले होते.

यासंदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यांत गो-तस्करांवर भादंवि कलम 307 सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ ठाण्याचे एपीआय चंद्रकांत पाटील एस.जे. माळी हे करीत आहेत. आझाद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जखमी झालेत. तसेच इनोव्हा गाडीची स्टेअरिंग तुटली. यावरून त्या गाडीच्या वेगाचा अंदाज लावता येतो. अपघात झाल्याबरोबर तस्करांनी इनोव्हातून पटापट खाली उड्या टाकल्या. तीन पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांच्या मागावर होते. म्हणून त्यांनी अंधाराचा फायदा घेत तेथूनही पळ काढला. पोलिसांनी इनोव्हा वाहन जप्त केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

झोप

PM Narendra Modi: “आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा...

0
केरळ | Kerala पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यावर होते. त्यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते शशी...