Sunday, May 19, 2024
HomeनाशिकDindori Loksabha 2024 : दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

Dindori Loksabha 2024 : दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

'या' उमेदवाराला देणार पाठिंबा

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha) मतदारसंघातून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीमधील भाजपकडून डॉ. भारती पवार (Dr.Bharti Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

- Advertisement -

मात्र, यामध्ये देशपातळीवरील इंडिया आघाडी आणि राज्य पातळीवरील महाविकास आघाडीचा घटक असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (Marxist Communist Party) दिंडोरीतून माजी आमदार जे.पी गावित (J.P. Gavit) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे मविआत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. पंरतु, आता माकपने दिंडोरीत भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा : Dhule Loksabha 2024 : डॉ. सुभाष भामरेंपेक्षा डॉ. बच्छाव अधिक श्रीमंत

आज झालेल्या माकपच्या राज्य सचिव मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत (Meeting) हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तसेच दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी (Voter) मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केले आहे.

दरम्यान, माकपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रयत्न देखील करण्यात आले होते. पंरतु, माकपच्या या प्रयत्नांना यश आले नव्हते. तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जे.पी. गावित यांची भेट घेत उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावेळी पाटील यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यानंतर अखेर आज माकपच्या राज्य सचिव मंडळाने एकमताने गावित यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा : “हेमंत करकरेंना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या, उज्ज्वल निकमांनी…”; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

माकपने नेमकं काय म्हटले आहे?

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ.जे. पी. गावित यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीचे जनतेने स्वागत देखील केले होते. मात्र, जनता आणि देशाच्या हिताशी द्रोह करणाऱ्या, भारताच्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही संघराज्य प्रणालीला आधारभूत असलेले संविधान बदलण्याचे उद्दिष्ट राबवणाऱ्या भाजपच्या उमेदवाराचा दिंडोरी मतदारसंघात दारुण पराभव करण्यासाठी आमच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत आहोत. त्यामुळे मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या