Saturday, July 27, 2024
Homeनाशिकउड्डाण पुलावरून शहरात प्रवेशासाठी पर्यायी मार्ग तयार करा- आ.दिलीप बनकर

उड्डाण पुलावरून शहरात प्रवेशासाठी पर्यायी मार्ग तयार करा- आ.दिलीप बनकर

निफाड । प्रतिनिधी Niphad

गेल्या अनेक दिवसापासून पिंपळगाव बसवंत ते गोंदे महामार्गाचे काम सुरु आहे. त्यात पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील बाजार समिती ते पाचोरे वणी फाटा पर्यंत उड्डाणपूल करण्यात आला आहे. सदर उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आल्याने पिंपळगाव बसवंत शहराजवळील उड्डाणपुल वाहतुकीसाठी ८ जानेवारीपासून दोन्ही बाजूने खुला करण्यात आला आहे. परंतु सदर उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील बाजार समिती ते पाचोरे वणी फाटा या ६ कि.मी. अंतरामध्ये पिंपळगाव बसवंत शहरात जाण्यासाठी कुठल्याही पर्यायी मार्ग काढण्यात आलेला नाही.

- Advertisement -

पर्यायी मार्ग सर्व्हिस रोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. पिंपळगाव बसवंत हे शहर मोठ्या लोकसंख्येचे शहर तसेच व्यापारीदृष्ट्या महत्वाचे तसेच ४० ते ५० गावांचा नेहमी संपर्क येत असतो तर आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असल्याने मोठ्या प्रमाणत टोमँटो, कांदा, द्राक्ष आदी पिकांची विक्री होत असल्याने येथे नेहमी वर्दळ सुरु असते. हि बाब लक्षात घेत आमदार दिलीपराव बनकर यांनी सबंधित नँशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी करीत प्रमिला लॉन्सजवळ उड्डाणपुलावरून पूर्व पश्चिम बाजूने चढ उतरणेकरिता पर्यायी मार्ग त्याचप्रमाणे शगुन लॉन्सजवळ पर्यायी मार्ग तसेच रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ बेहेड, नारायणटेंभी, कारसुळ आदी गावांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात यावा.

पाराशरी नदीवर सर्व्हिस रोडसाठी नवीन पूल तयार करावा, चिंचखेड चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गार्डन व व्यावसायिकांसाठी शौचालय निर्मिती करावी, सर्व्हिस रोड लगतच्या गटारीचे काम त्वरित पूर्ण करावे, सर्व्हिस रोड लगतचे स्ट्रीट लाईट बसविणे, सर्व्हिस रोड लगतची साफसफाई करणे, वणी चौफुली येथील सर्कल दुरुस्ती करून निर्माण होणारे अडचणी दूर करण्यात याव्या असे विविध प्रश्न लवकरात लवकर पूर्ण होणेकरिता आमदार दिलीप बनकर यांनी सबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके, पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास मोरे, पिंपळगाव बसवंत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष बाळा बनकर आदीसह नँशनल हायवे अथोरीटीचे अधिकारी दिलीप पाटील, पंकज मोहाबे, मुरली मोहन, सुरेश शिंदे, फैजान खान, विनोद बच्छाव, निखील गाडे, प्रविण जावरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या