Monday, November 25, 2024
Homeक्रीडाInd vs Pak : राखीव दिवशीही भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय होणार?...

Ind vs Pak : राखीव दिवशीही भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय होणार? काय असेल समीकरण?

दिल्ली | Delhi

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात पावसाच खेळ पाहायला मिळाला, त्यामुळे रविवारचा हा सामना आता राखीव दिवशी म्हणजेच आज (सोमवार) सुरू होणार आहे. आज दुपारी 3 वाजता पावसामुळे जिथे सामना थांबला तिथपासून म्हणजे 24.1 ओव्हरपासून सुरू होईल. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताचा स्कोअर 24.1 ओव्हरमध्ये 147/2 एवढा झाला. रोहित 49 बॉलमध्ये 56 रन करून तर गिल 52 बॉलमध्ये 58 रन करून आऊट झाले. केएल राहुल 17 रनवर तर विराट कोहली 8 रनवर खेळत आहे.

- Advertisement -

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजही कोलंबोत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी १० वाजता जोरदार पाऊस पडेल. त्यांनतर काही तास पाऊस थांबेल. मात्र दुपारनंतर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते. जर राखीव दिवशीही हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तर हा दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल आणि सामना रद्दची घोषणा केली जाईल.

सुपर-4 च्या पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. त्याचे एका सामन्यात दोन गुण आहेत. पाकिस्तानचा निव्वळ रनरेट +1.051 आहे. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचेही एका सामन्यात दोन गुण आहेत, मात्र नेट रनरेटमध्ये ते पाकिस्तानच्या मागे आहे. श्रीलंकेचा निव्वळ धावगती +0.420 आहे. भारत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याला अजून पहिला सामना खेळायचा आहे. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्याचे दोन सामन्यांत शून्य गुण आहेत. त्याने दोन्ही सामने गमावले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या