दिल्ली | Delhi
आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेला आजपासून बरोबर १ महिन्यानंतर सुरुवात होणार आहे. स्पर्धेपूर्वी अनेक देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये आता भारतीय संघाचाही समावेश झाला आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मंगळवारी (दि. ०५ सप्टेंबर) विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी निवडलेल्या १७ सदस्यांपैकी १५ सदस्यांचा समावेश आहे.
वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत एकूण १० संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा ४५ दिवस चालणार असून स्पर्धेत १० ठिकाणी एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध १ सामना खेळेल. गुणतालिकेतील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
टीम इंडिया वर्ल्ड कप वेळापत्रक
८ ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
१४ ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
१९ ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
१२ नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू