Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रPune Porsche Car Accident : अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक; दोघांची एकत्रित होणार...

Pune Porsche Car Accident : अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक; दोघांची एकत्रित होणार चौकशी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

मुंबई | Mumbai

पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal Arrest) यांना क्राइम ब्रांचने अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. यानंतर या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला १५ तासांत जामीन मिळाला होता. यावरुन समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत होता.

त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. तसेच अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर त्याच्याऐवजी आईने रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानंतर आता या पार्श्वभूमीवर आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता अल्पवयीन मुलगा आणि आई शिवानी अग्रवाल यांची समोरासमोर बसवून पोलिसांकडून एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे.

मुलगा आणि वडिलांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

नेमकी घटना काय घडली होती?

१७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केले होते. तसेच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या