Friday, May 3, 2024
Homeनाशिकमोबाईल चोर गजाआड; 'इतक्या' किमतीचा मुद्देमाल जप्त

मोबाईल चोर गजाआड; ‘इतक्या’ किमतीचा मुद्देमाल जप्त

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

 येथील भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) सापळा रचून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली. दरम्यान, संशयित आरोपीकडून चोरी केलेले एकुण १२ मोबाईल (Mobile) फोन मिळून आले असून, एकूण ४७ हजार, ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

इम्राण हनिफ पठाण (Imran Hanif Pathan) (वय २९, रा. विनयनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ५ मार्च रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात भागचंद गणेश लध्दड (वय ६७, रा. देवळाली गांव, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली होती. संशयित आरोपीने फिर्यादी रिक्षाचालकाच्या सदऱ्याच्या खिशातील मोबाईल फोन चोरी करून पळविला होता.

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात नाशिकला काय? जाणून घ्या

गुन्हे (Crime) शोध पथकाचे सपो. नि. किशोर खांडवी यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांस शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पो.ना. संदिप शेळके, विशाल काठे यांना गोपनिय माहिती मिळाली की, मोबाईल चोरी करणारा संशयित सितळादेवी मंदिर परिसरात येणार आहे.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प; भुजबळांची राज्य सरकारवर टीका

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यानुसार सपो.नि. खांडवी शामकांत पाटील, संजय पोटींदे यांच्या पथकाने अमरधाम रोड परिसरात सापळा रचून संशयित आरोपी त्या ठिकाणी येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता चौकमंडई येथुन एका रिक्षावाल्यावाचा मोबाईल फोन खेचुन चोरी केला होता, असे सांगितले, तसेच इतरही मोबाईल चोरल्याचे चौकशीत समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या