Thursday, May 15, 2025
Homeनगरमुलाच्या गळ्याला चाकू लावत लुटला सात लाखांचा ऐवज

मुलाच्या गळ्याला चाकू लावत लुटला सात लाखांचा ऐवज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील हिंगे वस्ती येथे सात ते आठ दरोडेखोरांनी शेतकरी जनार्धन संभाजी हिंगे (वय 37, रा. वाळुंज) यांच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावून व इतर व्यक्तींना मारहाण करून साडेतीन लाख रुपये रोख व दागिने असा 7 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. शुक्रवारी रात्री अडीच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगे यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्री दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील व्यक्तींना मारहाण करत हिंगे यांच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावून धमकावले. फिर्यादी हिंगे, त्यांच्या आईच्या गळ्यातील दागिने, तसेच बेडरुम मधील लोखंडी कपाटातील 14.6 तोळे सोन्याचे दागीने व साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम असा 7 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दुर्दैवी : अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

0
  नगरसूल | वार्ताहर   अंतापूर ताहाराबाद येथून देव दर्शन करून घरी परत येणाऱ्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला असुन यात नगरसूल(ता.येवला)वडाचा मळा येथील पिता- पुत्राचा अपघातात दुर्दैवी...