Tuesday, September 15, 2026
HomeनाशिकCrime News : विंचूरला पहाटे ATM फोडले, लाखोंची लूट

Crime News : विंचूरला पहाटे ATM फोडले, लाखोंची लूट

विंचूर । प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील विंचूर (Vinchur) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (SBI ATM) बुधवारी रात्री अज्ञात चौघा चोरट्यांनी फोडून अंदाजे ३० लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना ही रात्री दीड वाजता घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास विंचूर येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कार घेऊन आलेल्या चोरटयांनी आत मध्ये प्रवेश मिळवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएममधील सर्व रक्कम लुटात ते फरार झाले. एटीएममधील छेडखानी नंतर लासलगाव पोलिस कार्यालयास संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोरटे फार झाले होते.

हे ही वाचा : चौघांना साठ लाखांचा गंडा

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे असाच एटीएम लुटीचा प्रकार घडला असून तेथे देखील मोठ्या प्रमाणात रक्कम लुटण्यात आलेली असून काही रक्कम एटीएम मध्ये फोडताना जळाल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar चार महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम...