Saturday, April 26, 2025
Homeक्राईमटोळक्याकडून मामा-भाच्याला मारहाण

टोळक्याकडून मामा-भाच्याला मारहाण

पाच जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मामा-भाच्याला पाच जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) करून जखमी केले. घनशाम कोंडीबा म्हस्के (वय 52 रा. निंबळक ता. नगर) व त्यांचा भाचा अतुल कोतकर अशी जखमींची (Injured) नावे आहेत. जखमी घनशाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अविनाश भाऊसाहेब कोतकर, नितीन भाऊसाहेब कोतकर (दोघे रा. रेणुका माता मंदिराजवळ, एमआयडीसी), बाबासाहेब कारभारी राहटळ, संतोष भोसले (पूर्ण नाव नाही, रा. माताजीनगर, एमआयडीसी) व संदीप मारूती कळसे (रा. निंबळक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 6 जून रोजी रात्री माध्यमिक विद्यालय इसळक-निंबळक (Isalak and Nimbalak) येथे चोर आले म्हणून घनशाम म्हस्के व त्यांचा भाचा अतुल कोतकर हे साडेनऊ वाजता तेथे गेले.

दरम्यान तुमचे येथे काय काम आहे असे म्हणून अविनाश, नितीन, बाबासाहेब, संतोष व संदीप यांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी घनशाम यांनी 13 जून रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार साबीर शेख अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...