Sunday, October 6, 2024
Homeक्राईमउसन्या एक लाख रुपयांसाठी तिघांना मारहाण

उसन्या एक लाख रुपयांसाठी तिघांना मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

ऊसने घेतलेले एक लाख रूपये परत दिले असताना देखील आरोपींनी एक महिला व त्यांच्या मुलांना लाथा बुक्कयांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी (Rahuri) तालुक्यातील देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथे घडली आहे. छाया मोहन साळुंके (वय 45 वर्षे, रा. गणेशनगर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी), यांनी राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) दिलेल्या फिर्यादीत म्हटले, मागील तीन महीन्यापुर्वी छाया साळुंके यांनी त्यांचे भाचे ज्ञानेश्वर खंडु धुमाळ, कृष्णा विनायक धुमाळ, भानुदास भाउसाहेब गोंडे या तिघांकडुन दवाखान्याच्या कामासाठी एक लाख रुपये ऊसने घेतले होते. त्यानंतर छाया साळुंके यांनी त्यांना थोडे थोडे करून एक लाख रुपये दिले होते. परंतु आरोपी आणखी पैश्यांची मागणी करत होते.

- Advertisement -

दि. 3 जूलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता छाया साळुंके या कामावर जात असताना आरोपी (Accused) आले व पैशाची मागणी केली. त्यावेळी छाया साळुंके त्यांना म्हणाल्या, मी तुमचे सर्व पैसे दिले आहेत. तुम्हाला एक लाख रुपये देवुनही, तुम्ही आमची गाडी घेवुन गेलात. आता मी तुम्हाला पैसे देणार नाही. असे म्हणाले असता आरोपींनी (Accused) छाया साळुंके व त्यांचा मुलगा रोहीत व मुलगी पुनम यांना शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर आमची पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुम्हाला जिवच मारुन टाकु, असा दम दिला.

छाया मोहन साळुंके यांच्या फिर्यादीवरून आरोपी भानुदास भाउसाहेब गोंडे, ज्ञानेश्वर खंडु धुमाळ, संगिता ज्ञानेश्वर धुमाळ, सिंधुबाई भाउसाहेब गोंडे, इंदुबाई खंडु धुमाळ, राजुबाई विनायक धुमाळ, पुजा कृष्णा धुमाळ, मिरा भानुदास गोंडे, कृष्णा विनायक धुमाळ, सर्व रा. गणेशनगर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांच्यावर गु.र.न. 783/2024 भारतीय न्याय संहिता कलम 115 (2), 118 (1), 189 (2), 191 (1), 351 (2), 351 (3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या