चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisagon
चाळीसगाव (Chalisagon) येथे स्टेशन परिसरात मध्यरात्री पूर्व वैमान्यातून एकावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. यात एका तरुणाला (Youth) गोळी लागली असून, तो जखमी झाला आहे.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ धाव घेऊन जखमीला रुग्णालयात हलवले आहे. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले असून, अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एकमेकांकडे बघण्यावरून जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेचा कसून तपास पोलीस करीत आहे.




