Tuesday, January 6, 2026
HomeनगरRahuri Crime News : राहुरीत निवडणूकीच्या वादातून गोळीबार, दोन जण जखमी

Rahuri Crime News : राहुरीत निवडणूकीच्या वादातून गोळीबार, दोन जण जखमी

उंबरे । वार्ताहर

निवडणूकीच्या वादातून राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. भाऊसाहेब शिवाजी नवले व संजय शिवाजी नवले हे दोघे जखमी या गोळीबारात जखमी झाले आहे.

- Advertisement -

याबात जखमी नवले यांनी सांगितले कि, आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आम्ही दोघे गुंजाळे बसस्थानकासमोर असणार्‍या किराणा दुकानाजवळ उभे होते. यावेळी बाबा चेंडवाल, सोना चेंडवाल, संदीप चेंडवाल, अविनाश चेंडवाल यांनी येऊन आम्हाला शिवीगाळ करत दमदाटी केली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्यांच्याकडे असणार्‍या गावठी कट्ट्यातून गोळी झाडली.

YouTube video player

ती गोळी भाऊसाहेब नवले यांच्या गुडघ्याला लागली. व संजय नवले यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला करून डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घातला. या घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाले असल्याची माहिती जखमींनी दिली. तसेच काल विधानसभेच्या निकालानंतर रात्री हल्लेखोरांनी नवले यांना फोनवर शिवीगाळ करीत दमदाटी व तुझा बेत बघतो अशी धमकी दिली होती. असेही त्यांनी सांगीतले.

दरम्यान, स्थानिकांनी तातडीने जखमी नवले यांना नगर येथे तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. जखमी नवले यांच्या पायाला गोळी लागली असून ती शस्त्रक्रिया करून काढण्यात येणार असल्याचे नातेवाईंकांनी सांगीतले. याघटनेची माहिती मिळताच राहुरीचे पो.नि. संजय ठेंगे यांनी आपल्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी भेट देऊन आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीसांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...