Sunday, May 10, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : खरातशी बिल्डरांचे लागेबांधे; काळा पैसा पांढरा करण्याचा डाव

Ashok Kharat Crime : खरातशी बिल्डरांचे लागेबांधे; काळा पैसा पांढरा करण्याचा डाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

श्रद्धा आणि चमत्काराच्या नावाखाली भक्तांना लुटणारा स्वयंघोषित बाबा अशोक खरातने (Ashok Kharat) ओझरमध्ये (Ozer) रिअल इस्टेटच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा (मनी लॉन्ड्रिा) केल्याचे समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात अधिकृत कारवाई केली असून विशेष म्हणजे, या आर्थिक व्यवहारांचा मास्टरमाईंड ओझरमधील एक बडा बांधकाम व्यावसायिक असल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

अशोक खरातने भक्तांकडून पैसे उकळले नाहीत, तर त्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी ओझर येथील एका डेव्हलपर्स नावाने एक कंपनी स्थापन केली होती. यात खरातची पत्नी आणि मुलगी कागदोपत्री भागीदार असल्या तरी पडद्यामागून सर्व सूत्रे ओझरचा हा बिल्डर फिरवत होता. ओझरमधील एका आलिशान टाऊन प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधींची हेराफेरी करण्यात आली. ईडीने (ED) या व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकली असता ९० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार आणि ६० लाख रुपयांची गोठवलेली रोकड यामुळे या संगनमतावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : शिर्डीतील जमीन व्यवहार मान्य; खरातची पोलिसांत कबुली, पुन्हा एसआयटीच्या ताब्यात

निवृत्त अधिकारी आणि जमिनींचा खेळ

या गुंतागुंतीच्या व्यवहारात मूळचा देवळा तालुक्यातील पण नाशकात स्थिरस्थावर झालेल्या एका निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याचे नावही समोर आले आहे. खरात आणि या अधिकाऱ्याने पत्नींच्या नावे जमिनींचे (Land) व्यवहार केले. सरकारी पदाचा गैरवापर करून मिळवलेली माया खरातच्या प्रकल्पात गुंतवण्यात आली होती का? याचा तपास आता ईडी करत आहे. जमिनींचे हस्तांतरण आणि बेनामी व्यवहार करण्यासाठी खरातने या अधिकाऱ्याच्या अनुभवाचा पूर्ण वापर करून घेतल्याचे समजते.

तपासाची ओढाताण

सध्या अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या कोठडीत असला तरी त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी यंत्रणांमध्ये चढाओढ सुरू आहे. मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्याखाली खरातला मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट मागत आहे. तसेच एसआयटी खरातच्या प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी कोठडीची मागणी करत आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज आयपीएलमध्ये डबल हेडर; CSK समोर LSG चे...

0
मुंबई | Mumbai आयपीएल (IPL) स्पर्धेचा १९ वा हंगाम निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असून, अंतिम ४ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अजूनही १० संघ शर्यतीत...