Friday, November 22, 2024
Homeनाशिकनातवाने केली घरातच चोरी; शौक भागविण्यासाठी आजीचे दागिनेच लांबविले

नातवाने केली घरातच चोरी; शौक भागविण्यासाठी आजीचे दागिनेच लांबविले

नाशिक। प्रतिनिधी

म्हसरुळ पाेलीसांच्या हद्दीत दाेन महिन्यांपूर्वी घडलेल्या एका क्लिष्ट चाेरीचा गुन्हा उघड करण्यात पाेलीसांना यश आले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे झालेली चाेरीची ही घटना बाहेरील चाेरट्यांनी नव्हे, तर चाेरी झाल्याची तक्रार दिलेल्या आजीच्या अल्पवयीन नातवानेच केल्याचे उघड झाले. चाेरीच्या मुद्देमालातून या नातवाने साेने वितळवून देणाऱ्या मित्राच्या मदतीने दाेन चारचाकी कार, माेबाईल हँन्डसेट खरेदी करुन उधळपट्टी केल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणात साेने वितळविणाऱ्या संशयित प्रितेश उर्फ विशाल शिंगाडे याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मखमलाबाद राेडवरील शांतीनगर बसस्टाॅपजवळील पार्थ नगरात ६६ वर्षीय महिला कुटुंबासह राहते. तिच्या घरातून डिसेंबर २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत उघड्या घरातून कुणीतरी दाेन लाख २३ हजारांचे साेन्याचे दागिने चाेरी केले हाेते. त्यामुळे या महिलेने म्हसरुळ पाेलीसांत फिर्याद नाेंदविली हाेती. तसेच वरील कालावधीत महिलेस घरातील साेफासेट, दिवानाची गादी पिंजायची असल्याने तिने तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या पिंजारी व्यावसायिकास बाेलावून गादी पिंजून घेतली हाेती. त्यामुळे महिलेने या चाेरीचा संशय पिंजारीवर घेत त्याच्या नावाची तक्रार दिली. त्यामुळे पाेलीसांनी गुन्हा उघड हाेण्यासाठी पिंजाऱ्याचा छडा लावून त्याची घरझडती घेतली. पण, घरात संशयास्पद काहीच आढळून न आल्याने त्याची सुटका केली.

तपास सुरु असतांना सीसीटीव्ही फूटेज व महिला आणि तिच्या कुटुंबाकडे चाैकशी करण्यात आली. तेव्हा विविध बाबींना चालना मिळत गेली. त्यात महिलेच्या साेळा वर्षीय नातवाकडे संशयाची सुई वळली. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या निर्देशाने उपनिरीक्षक उद्धव हाके, दीपक पटारे, हवालदार सदानंद फुगे, प्रशांत देवरे यांनी या मुलास विश्वासात घेऊन चाैकशी केली असता, त्याने कबुली देत प्रितेश तानाजी शिंगाडे (रा. ओम् नगर, विद्यानदरजवळ, पंचवटी) याचे नाव सांगितले. घरातून आजी व आईचे चाेरलेले साेन्याचे दागिने अल्पवयीन नातवाने शिंगाडे याला दिले. शिंगाडेने ते अवैधरित्या वितळवून बनविलेल्या लगड विकल्या. मिळालेल्या ‘कॅश’मधून अल्पवयीन मुलासह शिंगाडे व त्याच्या साथीदारांनी दाेन कार, माेबाईल खरेदी करत माैजमस्ती केली.

ही तर टाेळी

अल्पवयीन मुलगा व शिंगाडेची ओळख कशी झाली, याचा तपास सुरु असून शिंगाडे व त्याच्या अन्य दाेन ते तीन साथीदारांचा सहभाग उघड हाेताे आहे. या साथीदारांवर चाेरी व इतर गुन्हे नाेंद असल्याचे समाेर आले असून त्यांचा शाेध सुरु आहे. या अल्पवयीनासह टाेळीने चाेरीचा हा प्लॅन आखून केवळ शाैक, माैजमजेसाठी पैसे उधळले आहेत. नातवाच्या या करामतीने कुटुंब अजूनही सावरलेले नाही. संगतीमुळे हा मुलगा वाम मार्गाला गेल्याचे पाेलीसांनी सांगितले.

गुंतागुंतीच्या या गुन्ह्यात आम्ही सखाेल तपासावर लक्ष दिले. त्यात संशयित शिंगाडे हा चाेरीचे साेने विकण्यासाठी मखमलाबादच्या गामणे मळ्याजळ हाेंडा सिटी कारने येताच कारवाई केली. दाेन लाख ९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात सेकंन्डहँन्ड कार, राेख, साेन्याच्या लगडचा समावेश आहे.

सुभाष ढवळे, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या