संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील रणखांब येथील खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून जावयाने सासर्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
तालुक्यातील साकुर जवळील रणखांब फाटा परिसरातील जंगलामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत तीन दिवसांपूर्वी आढळला होता. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी 72 तासाच्या आत या प्रकरणाचा तपास लावण्यात यश मिळवले आहे. मयत व्यक्तीचे नाव गोरख दशरथ बर्डे असून तो संगमनेर तालुक्यातील मीरपुर लोहारे येथील रहिवासी आहे. दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) व विलास लक्ष्मण पवार (रा. माळवाडी, साकूर, ता. संगमनेर) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
Accident News : माल वाहतूक ट्रक कारवर कोसळला; चौघांचा करूण अंत
तर यात एका महिलेस देखील आरोपी करण्यात आले आहे. मयत गोरख बर्डे हा आरोपी यांचा पाहुणा आहे. मात्र, बर्डे याची वागणूक ही चांगली नव्हती. मयत गोरख याचे आरोपींच्या जवळच्या व्यक्तींशी अनैतिक संबंध आहे, अशी आरोपींना शंका होती. त्यामुळे, हे मयत बर्डे याच्यावर पाळत ठेवून होते. दरम्यानच्या काळात बर्डे आणि संबंधित महिला यांची भेट झाली आणि आरोपी दिनेश पवार व विलास पवार यांनी त्यास रंगेहाथ पकडले. आरोपी यांनी मयत गोरख बर्डे याला दि. 15 डिसेंबर रोजी एका लग्नाला बोलविले होते. पाहुण्यांचे लग्न असल्यामुळे बर्डे आणि त्याचा जीव जडलेली व्यक्ती देखील तेथे आली होती. दुपारी लग्न लागले तेव्हा यांच्यात वारंवार चर्चा होणे, एकमेकांकडे पाहणे सुरू होते. या सर्व घडामोडींवर आरोपींचे बारीक लक्ष होते. त्यामुळे, त्यांनी बर्डे यास समजून देखील सांगितले होते. मात्र, तो काही सुधरुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. लग्न आटोपल्यानंतर रात्री वरात देखील होती. त्यामुळे बर्डे हा वरातीला देखील गेला होता. सगळ्यांच्या नजरा चुकवून रात्री काहीतरी डाव साधण्याच्या हेतूने तो गेला होता.
आ. प्राजक्त तनपुरेंना पुन्हा ईडीचे समन्स
रात्री वरात सुरू झाली. सर्व नाचण्यात दंग असताना बर्डे आणि त्याची प्रेयसी बाजुला गेले. त्यांची चर्चा सुरू असताना या दोघांनी अचानक तेथे एन्ट्री केली. त्यानंतर बर्डे यास बेदम मारहाण करुन त्याला कायमचे संपविण्याचा कट यांनी आखला. बर्डे यास मारहाण करुन धारधार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर त्याचा गळा आवळून ठार मारुन टाकले. पुरावा नष्ट करण्यासाठी ज्वलनशिल पदार्थाने बर्डे याचा चेहरा जाळून टाकला. बर्डे याला उचलून त्यांनी रणखांब येथील जांभुळवाडी शिवारात फॉरेस्टच्या हद्दीत आणले. त्याच्या अंगावर, तोंडावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटून दिले. त्यानंतर मयताचा चेहरा, छाती पुर्णपणे जळली होती.
एमआयडीसीचे श्रेय तुम्ही घ्या, पण रिकामे उद्योग करू नका
दरम्यान, दि.16 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट परिसरात एक जनावरे वळणारा व्यक्ती शेळ्या घेऊन गेला होता. तेव्हा त्याने हा मृतदेह पाहिला त्याने तत्काळ पोलीस पाटील यांना फोन केला. त्यानंतर काही वेळानंतर गावकरी घटनास्थळी हजर झाले. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक खेडकर यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी घाव घेतली आणि पंचनामा करुन तपास सुरू केला. दोन दिवसानंतर मयताची ओळख पटली घारगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन या खुनाची उकल केली. दिनेश शिवाजी पवार व विलास लक्ष्मण पवार अशा दोघांना अटक करण्यात आले असून महिला अद्याप पसार आहे.
1217 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी