Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमधक्कादायक ! झोपेत असलेल्या वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने केला खून

धक्कादायक ! झोपेत असलेल्या वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने केला खून

संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

घराजवळी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या वृद्धाच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने मारुन खून (Murder) केल्याची घटना झोळे (ता.संगमनेर) शिवारात घडली आहे. सोमवारी (दि. 5 ऑगस्ट) सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. साहेबराव भिमाजी उनवणे (वय 77) असे खून (Murder) झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की झोळे येथील साहेबराव उनवणे हे नेहमीप्रमाणे जेवण करुन घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. त्यानंतर रात्री साडेअकरा ते सकाळी सहा वाजेपूर्वी अज्ञाताने कोणत्या तरी हत्याराने (Weapon) डोक्याला मारुन खून केला. सकाळी सून बाहेर आली असता सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे धक्कादायक दृश्य कुटुंबियांनी पाहताच एकच आक्रोश झाला. मयत वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना (Sangamner Taluka Police) माहिती दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोना. अमित महाजन आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर तत्काळ श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केले. तसेच तपासाकामी वेगवेगळ्या पथकांना रवाना करण्यात आले. याप्रकरणी खून (Murder) झालेल्या वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे हे करत आहे. या घटनेने झोळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...