Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : चौथी पास गांजा तस्कर ताब्यात

Nashik Crime : चौथी पास गांजा तस्कर ताब्यात

जळगावातून नाशकात सप्लाय, झोपडपट्टीसह टवाळांना विक्री

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जेमतेम चौथीपर्यंतच शिक्षण केलेल्या एका बहाद्दराने हजारो, लाखो रुपयांच्या गांजा (Ganja) तस्करीत हातखंडा मिळविल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे अमली पदार्थ (Drugs) विरोधी पथकाने त्याला चतुर्भूज करण्यापूर्वी एनडीपीएस कायद्याच्या तरतुदी व उद्देश समजावून सांगितला असता त्याने तयारी दर्शविली मात्र, थेट कायद्यान्वये पथकाची व पंचांची अंगझडती घ्यायची असल्याचे कळताच, त्याची पाचावर धारण बसली व त्याने अंगझडती घेण्यास नकार देत पुढील कारवाईस सहकार्य केले.

- Advertisement -

तसेच त्याने हा गांजा चाळीसगाव (Chalisgaon) येथील प्रशांत पवार याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांवर उपनगर पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला असून पवारचा शोध सुरु झाला आहे. अनिल उर्फ काळू दिनेश खरे (वय ३०, रा. किराणा दुकानाच्या बाजूला, मंगल मूर्तीनगर, कॅनोल रोड झोपडपट्टी, उपनगर) असे संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या एनडीपीएस पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना (दि. २४) खरे हा गांजाची तस्करी व विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, त्यांनी एनडीपीएस पथकाच्या (NDPS Team) वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांना कळविताच त्यांनी उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने सापळा पूर्व आणि यशस्वी सापळ्याची तयारी केली. सहायक निरीक्षक विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे व पथकाने झोपडपट्टीनजिकच्या पाण्याचे टाकीजवळ संशयित खरेचा अटकाव करत त्याला कारवाईची माहिती दिली. त्याने कोणतेही आढेवेढेन घेता झडतीपूर्वी उपस्थित असलेल्या पोलीस पथकाची व पंचाची अंगझडती घेण्यास नकार दिला. त्याचवेळी सहायक उपनिरीक्षक ताजणे यांनी अनिल उर्फ काळूची झडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात मोबाईल, एका पिशवीत गांजाची पाने, फुले व बिया आढळून आल्या.

इ साक्ष नोंद

पथकाने ही कारवाई करताना नव्याने अमलात आलेल्या भारतीय साक्ष अधिनियम २०२३ च्या तरतुदींनुसार, मोबाईलमध्ये ई-साक्ष तसेच व्हिडीओग्राफी केली. त्या ई-साक्ष अॅपमध्ये अपलोड करून प्रमाणपत्र व हॅश व्हॅल्यू काढून घेतल्या आहेत.
.
२ किलो ३१० ग्रॅम गांजा जप्त

खरे याच्याकडून पथकाने ४६ हजार २०० रुपयांचा गांजा हस्तगत केला असून तो जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील प्रशांत पवार याच्याकडून खरेदी केला आहे. प्रशांत पवार याने हा गांजा कुठून आणला, त्याचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नरेंद्र बैसाने करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...