नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवैधपणे गोवंशीय जनावरांची कत्तल व तस्करी करणाऱ्यांविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) वर्षभरात धडक कारवाई (Action) केली आहे. यात जिल्हाभरात ३४५ गुन्ह्यांमध्ये १ हजार ९१७ गोवंशीय जनावरांची (Bovine Animals) सुटका केली असून ७ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्यासह एलसीबीचे निरीक्षक राजू सर्वे यांना जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या अवैध होणारी कत्तल आणि तस्करीविरोधात धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २०२४ या वर्षात जिल्हाभर पोलिसांनी (Police) कठोर कारवाई केली आहे.
यासाठी पोलीसांनी मालेगावसह जिल्ह्यातील (District) झोडगे, जायखेडा, सुरगाणा, अभोणा, पेठ, बार्हे, हरसूल, नांदूरशिंगोटे, पाथरे फाटा, घाटनदेवी अशा सीमावर्ती भागात नाकाबंदी करीत गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सण-उत्सवाच्या काळात विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. गोवंश जनावरांची अवैधरित्या कत्तलीसाठीची वाहतूक, गोवंश मांस विक्री असे प्रकार घडू नये यासाठी जास्तीत-जास्त प्रतिबंधात्त्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गोवंशीय कारवाई
एकूण गुन्हे : ३४५
संशयित अटक : ४७४
जप्त गोवंशीय जनावरे : १९१७
जप्त गोवंशीय मांस: १६ हजार ९५८ किलो
जप्त वाहने : २७२
एकूण मुद्देमाल : ६ कोटी ९४ लाख ६१ हजार १२५ रुपये