Friday, April 25, 2025
Homeनगरजिवंत जनावरे व गोमांसासह साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त

जिवंत जनावरे व गोमांसासह साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त

राहाता |प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील ममदापूर येथे गोवंशी जनावरांची कत्तल करण्यासाठी गोवंशी जातीची काही जिवंत जनावरे निर्दयतेने शेडमध्ये डांबुन ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पथकाने लागलीच त्या ठिकाणी जावुन खात्री करत घराचे लगत असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करतांना दिसून आले. गुन्हे शाखेच्या पथकाने गोमांस व जिवंत जनावरे असा 12 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 5 आरोपी अटक केली तर 6 जण पसार झाले आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आपल्या पथकाला गोमांस वाहतूक व विक्री करणारे इसमांची माहिती घेवून मिळुन आल्यास आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि हेमंत थोरात, पोउपनि तुषार धाकराव व अंमलदार मनोहर गोसावी, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, राहुल सोळुंके, संदीप दरंदले, संतोष खैरे, भिमराज खर्से, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर हे पथक घटनास्थळी पोहचले असता पत्र्याचे शेडमध्ये 8 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करतांना दिसून आले. त्यावेळी पथक शेडचे गेट उघडतांना गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसम भिंतीवरुन उड्या मारुन पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन 3 जणांना शिताफीने ताब्यात घेतले व उर्वरीत अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी इरफान शेरखान पठाण, अनिस नुरा पठाण व जावेद नाजु शेख, तिन्ही रा. ममदापूर यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या साथीदारांची नावे व पत्ता विचारता त्यांनी अदिल सादिक कुरेशी, नाजीम आयुब कुरेशी, वसीम हनीफ कुरेशी, आरिफ अमीर कुरेशी व शोएब बुडन कुरेशी सर्व रा. ममदापूर, ता. राहाता असे सांगितले.
ताब्यातील आरोपींकडे कत्तल केलेल्या गोमांस बाबत अधिक विचारपुस करता त्यांनी कत्तलीसाठी आणलेली जनावरे ही अल्ताफ जलाल शेख याचे घराचे लगत अलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेले असल्याचे सांगुन तो तसेच सुरेश लक्ष्मण खरात व मुम्तजील मुनीर कुरेशी हे कत्तलीसाठी जनावरे आणुन देतात असे सांगितल्याने पथकाने अल्ताफ जलाल शेख याचे घराचे मागील बाजुस असलेल्या पत्र्याचे शेडमधुन सुरेश लक्ष्मण खरात व अल्ताफ जलाल शेख यांना ताब्यात घेतले. यातील मुम्तजील मुनीर कुरेशी हा इसम पळुन गेला.

ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींचे कब्जात 9 लाख 90 हजार रुपये किंमतीचे 3 हजार 300 किलो गोमांस व 2 लाख 50 हजार रुपये किंमतीची 50 गोवंशीय लहान जनावरे, 15 हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व 200 रुपये किंमतीचा 1 लोखंडी सत्तुर असा एकुण 12 लाख 55 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुध्द लोणी पो.स्टे. गुरनं 265/2024 भादंवि कलम 269, 429, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), (ब), (क), 9 व प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...