Friday, May 3, 2024
Homeनगरस्कुटीच्या डिकीतून आरोग्यसेविकेची पर्स चोरट्यांनी लांबविली

स्कुटीच्या डिकीतून आरोग्यसेविकेची पर्स चोरट्यांनी लांबविली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोकर उपकेंद्रातील आरोग्यसेविका म्हणून काम करणार्‍या महिलेची 66 हजार 500 रुपयांचे दागिने व रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोकर उपकेंद्रातील आरोग्यसेविका म्हणून काम करणार्‍या विजया नावाच्या महिलेच्या डिओ स्कूटीच्या डिकीतून पर्स चोरीस गेली. या पर्समध्ये सोन्याची चैन, रोकड तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, स्टेट बँकेचे डेबीट कार्ड असा सुमारे 66 हजार 500 रुपयांचा ऐवज होता.

दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासा रोडवर काळे दालमिल, भोकर शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसात आरोग्यसेविका विजया यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या