Thursday, March 27, 2025
Homeक्राईमवारंवार पाठलाग करून शिक्षिकेसोबत गैरवर्तन

वारंवार पाठलाग करून शिक्षिकेसोबत गैरवर्तन

दोन तरूणांविरूध्द तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षिकेचा वारंवार पाठलाग करून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्‍या दोन तरूणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी उपनगरात राहणार्‍या पीडित शिक्षिकेने या प्रकरणी मंगळवारी पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिग्विजय गणेश गावडे (रा. रावसाहेब पटवर्धन स्मारका जवळ, प्रोफेसर चौक, सावेडी) व सलमान रॉय (पूर्ण नाव व पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सन 2020 मध्ये फिर्यादीची दिग्विजय सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. तेव्हापासून तो फिर्यादीसोबत वारंवार संपर्क करू लागला. 18 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादीच्या घरात प्रवेश करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. यासंदर्भात त्याच्या आईला सांगितल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला नव्हता.

दरम्यान 27 मे 2024 रोजी त्याने फिर्यादीला अश्लिल भाषेत मेसेज केले. घरासमोर येऊन शिवीगाळ केली. यासंदर्भात फिर्यादीच्या पतीने त्याला फोन करून जाब विचारला असता त्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यानंतर 7 व 15 जुलै 2024 रोजी त्याने फिर्यादीला त्याच्या व मित्र सलमान याच्या मोबाईलवरून फोन करून त्रास दिला. त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिग्विजयसह त्याचा मित्र सलमान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Court Verdict : सात वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik घरात खेळण्यासाठी आलेल्या सात वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजूरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे....