Thursday, May 23, 2024
Homeनगरमागील भांडणाच्या वादातून कुर्‍हाडीने व शस्त्राने मारहाण

मागील भांडणाच्या वादातून कुर्‍हाडीने व शस्त्राने मारहाण

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

मागील भांडणाच्या वादातून नेवासा तालुक्यातील दिघे येथील 9 जणांनी कुर्‍हाड व शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना घडली. मारहाणीत 6 जण जखमी झाले असून नगर येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबबात चंद्रकांत कडुबाळ चव्हाण (वय 35) रा. दिघी ता. नेवासा यांनी दिलेल्या जबाबाबात म्हटले की, 9 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मी तसेच अशोक कडूबाळ चव्हाण, सुवर्णा चंद्रकांत चव्हाण (पत्नी), मयुरी अशोक चव्हाण (पुतणी), जनाबाई कडूबाळ चव्हाण, सुनीता अशोक चव्हाण (भावजई) असे घरी असताना मागील भांडणाच्या वादातून भागचंद नाथा शिंदे हा आमच्या घराजवळ आला व शिवीगाळ करु लागला.

म्हणून आम्ही सर्वजण घराबाहेर आलो. त्यावेळी त्याचेसोबत आम्हाला आणखी रोहीदास नाथा शिंदे, रावसाहेब नाथा शिंदे, सतीष रावसाहेब शिंदे, रवींद्र रोहीदास शिंदे सर्व रा. दिघी ता. नेवासा तसेच अमोल अंकुश निकम रा सलबतपूर, अमोल दत्तात्रय निकम, दत्तात्रय निकम (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. बाभुळखेड़ा ता नेवासा, सुनिल अंकुश निकम (रा. सलाबतपूरअसे मला घरासमोर उभे असलेले व शिवीगाळ करत व हातात काठ्या वगेरे असलेले दिसले.

ते आम्हाला शिवीगाळ करत असल्याने मी त्याना समजाऊन सांगत असतांना भागचंद नाथा शिंदे यांने माझ्या डोक्यात कुर्‍हाड़ मारलीं त्यावेळेस मी रक्तबंबाळ होऊन जबर जखमी झाल्याने खाली पडलो. त्यावेळेस तेथे असलेल्या अमोल दत्तात्रय निकम याने त्याचे हातातील धारदार शस्ञाने माझ्या डोक्यात उजवे खांद्याचे बाजुस मानेजवळ वार केले तसेच अमोल अंकुश निकम रा. सलाबतपूर याने

माझा भाऊ अशोक कडुबाळ चव्हाण याचे डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन जबर जखमी केले आहे. त्यावेळी ईतर लोकांनी काठ्याने व दगडाने पत्नी सुवर्णा, पुतणी मयुरी, आई जनाबाई, भावजयी सुनिता हिस मारहाण, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच रामेश्वर आण्णासाहेब नवले रा. बाभुळखेड़ा ता. नेवासा यांने देखील लोखंडी पाईपने मयुरी व सुनिता याना मारहान केली.

त्यावेळी आमचा भांडणाचा आवाज ऐकुन रोडने जाणारे आबासाहेब कुंडलीक गोरे व ईतर लोकांनी आमचे जवळ येउन कशीबशी सोडवासोडव केली. त्यांनी मला व भाऊ अशोक, पत्नी सुवर्णा, पुतनी मयुरी, आई, भावजयी सुनिता अशाना 108 अ‍ॅम्बुलन्सने नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले.

तेथून भाऊ आशोक पत्नी सुवर्णा, पुतनी मयुरी यांना जास्त मार लागल्याने सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले असून सिव्हील हॉस्पीटल येथून नोबल हॉस्पीटल येथे रेफर केल्याने तेथे औषधोपचार करत आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील 9 जणांविरुद्ध मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचा गनुहा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या