Sunday, April 27, 2025
Homeक्राईमकिरकोळ कारणातून दोन समाजांच्या गटांत वाद

किरकोळ कारणातून दोन समाजांच्या गटांत वाद

बुरूडगाव रस्त्यावरील घटना || परस्पर फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरासमोर पाणी टाकल्याच्या वादातून बुरूडगाव रस्त्यावरील फुलसौंदर मळ्यात दोन समाजाच्या गटांत वाद झाले. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (29 जुलै) दुपारी ही घटना घडली.

- Advertisement -

सानिया फरझान खान (वय 20 रा. फुलसौंदर मळा, बुरूडगाव रस्ता, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल मुनोत, दिपाली अतुल मुनोत (दोघे रा. फुलसौंदर मळा, बुरूडगाव रस्ता, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सानिया खान त्यांच्या राहत्या घरासमोर पाणी टाकत असताना अतुलने त्यांना बोलावले व तुम्ही खरकाटे पाणी रस्त्यात का टाकता, तुम्ही खूप गचाळ राहता असे म्हणून सानिया व त्यांच्या सासूला शिवीगाळ केली. तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसर्‍या गटाच्या दिपाली अतुल मुनोत (वय 43 रा. फुलसौंदर मळा, बुरूडगाव रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सानिया फरझान खान, शाकिर शेख, फैजान खान (तिघे रा. फुलसौंदर मळा, बुरूडगाव रस्ता) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानिया यांनी दिपाली यांच्या घरासमोर पाणी टाकल्याने त्या तिला म्हणाल्या तू नेहमी आमच्या घरासमोर पाणी का टाकते. याचा सानिया व शाकिर शेख, फैजान खान यांना राग आल्याने त्यांनी दिपालीला शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0
चोपडा | प्रतिनिधी | Chopda जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार...