Wednesday, February 11, 2026
Homeक्राईमCrime News : पूर्ववैमनस्यातून युवकाला भिंतीवर आदळून मारहाण

Crime News : पूर्ववैमनस्यातून युवकाला भिंतीवर आदळून मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील पटवेकर गल्ली परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, एका युवकाला मारहाण करण्यात आली आहे. सुझेल मतीन शेख (वय 19, रा. भाकरे गल्ली, सर्जेपुरा) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून साद साजिद तांबोळी (रा. अहिल्यानगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुझेल हा 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपल्या लहान भावाला क्लासवरून आणण्यासाठी गेला होता. यावेळी अरूंद गल्लीतून दुचाकी जोरात चालवल्याचा जाब विचारल्याने साद तांबोळी याचा पारा चढला. त्याने ‘मी इथला डॉन आहे,’ असे म्हणत सुझेलची गचांडी धरली व त्याचे डोके जवळच्या भिंतीवर जोराने आदळले. यात सुझेलला चक्कर येऊन तो खाली पडला असता, सादने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

YouTube video player

नाका-तोंडाला दुखापत झाल्यानंतर सादने दुचाकीतून चाकू काढून जीवे मारण्याची धमकी दिली. सुमारे महिनाभरापूर्वीही सादने सुझेलला विनाकारण दमदाटी केली होती, त्यातूनच हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. जखमी सुझेलवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेत साद तांबोळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरातील आदर्श लॉज एक वर्षासाठी बंद

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरातील आदर्श लॉज येथे सुरू असलेल्या अनैतिक देह व्यवसायाच्या प्रकारामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे सदर लॉज एक वर्षासाठी बंद...