Sunday, June 30, 2024
Homeक्राईमचौघांकडून तरुणाला सर्जेपुरात मारहाण

चौघांकडून तरुणाला सर्जेपुरात मारहाण

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

तरूणाला चौघांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना सर्जेपुरातील मिलन हॉटेलजवळ घडली. अनिकेत अनिल सैंदर (वय 25 रा. तेलीखुंट चौक, एमजी तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी आव्हाड (रा. नगर), सुरज खरमाळे, महेश साबळे, निहाल लोखंडे (सर्व रा. सिव्हिल हॉस्पिटल परिसर, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सोमवारी (24 जून) सायंकाळी अनिकेत दुचाकीवरून मंगळवार बाजार येथे जात असताना त्यांना सर्जेपुरातील मिलन हॉटेलजवळ चौघांनी अडवले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लोखंडी फायटर होते. त्यांनी अनिकेत यांना रॉड, दांडके व फायटरने मारहाण करून जखमी केले. ‘तु जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुला जिवे ठार मारून टाकू’ अशी धमकी दिली. भांडणामध्ये अनिकेत यांच्या खिशातील आठ हजार 600 रुपये पडून गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अनिकेत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी (25 जून) पोलिसांत फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार विलास लोणारे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या