Wednesday, March 26, 2025
Homeनगरपेटवून दिलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पेटवून दिलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे मागील झालेल्या वादाच्या कारणावरून 8 जुलै रोजी मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने 35 वर्षीय इसम उपचार घेत असताना मयत झाले आहेत. गणेश अर्जुन आव्हाड (वय 35) धंदा-ड्रायव्हर रा. महालक्ष्मी हिवरे यांनी उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरुन फिर्याद नोंदवण्यात आली होती. फिर्यादीवरून मारुती मोहन सानप, शहादेव कारभारी सानप रा. महालक्ष्मी हिवरे यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

गणेश आव्हाड यांनी उपचार घेत असताना फिर्याद दिली होती की, घरासमोर मोटरसायकल मधून बाटलीमध्ये पेट्रोल काढत असताना आरोपींनी मागील झालेल्या वादाच्या कारणावरून तसेच मावशी व आरोपी यांच्यातील जमिनीचे वादाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हातातील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल अंगावर पडले असता आरोपी मारुती मोहन सानप याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील काडीपेटीने पेटून दिले.

यावरून आरोपी विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात 295/2024 कलम 109, 115, (2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना शुक्रवार 12 जुलै रोजी मयत झाल्याने सदर गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता कलम 103(1) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नतीला महासभेची मंजुरी

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा तसेच स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी विविध विकास कामांना मंजुरी देताना...