Saturday, September 21, 2024
Homeनगरअ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक

अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

पती-पत्नीला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत पत्नीसोबत गैरवर्तन करणार्‍या तरूणाला पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने अटक केली आहे. धनवान ऊर्फ बाळू मच्छिंद्र दिघे (वय 33 रा. वैभव कॉलनी, रेणविकर शाळेच्या मागे, सावेडी) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून धनवान ऊर्फ बाळू दिघेसह सहा जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

नगर शहरातील एका उपनगरात राहणारे फिर्यादी व त्यांचे पती 6 मे, 2022 रोजी रात्री जेवण झाल्यानंतर पायी फिरत असताना धनवान ऊर्फ बाळू दिघे व त्यांच्यासोबतच्या इतरांनी फिर्यादी यांना शुकशुक असा आवाजा करून पतीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. धनवान दिघे याने हातातील काहीतरी टणक वस्तूने फिर्यादीच्या पतीच्या तोंडावर मारून जखमी केले. आरोपींनी फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, दांडक्याने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केले होते.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अ‍ॅट्रोसिटीचे वाढीव कलम लावण्यात आल्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक कातकडे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांच्या पथकाने यातील आरोपी धनवान दिघे याला अटक केली आहे. अधिक तपास उपअधीक्षक कातकडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या