Saturday, May 25, 2024
Homeनगर15 गुन्हे असलेला सराईत गजाआड

15 गुन्हे असलेला सराईत गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. नवनाथ उर्फ मटक्या उर्फ नारायण ईश्वर भोसले (वय 23 रा. बेलगाव ता. कर्जत) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरूध्द नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खुनासह दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी, चोरी असे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा आढावा घेऊन आरोपीविरूध्द विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार संतोष लोढे, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष खैरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालींदर माने, अरुण मोरे यांचे पथक स्थापन करून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

सदरचे पथक गुन्ह्यांचा आढावा घेत असताना नगर तालुक्यातील जबरी चोरी व पारनेर तालुक्यातील घरफोडी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मटक्या उर्फ नारायण ईश्वर भोसले हा मिरजगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने मिरजगाव येथे जाऊन मटक्या भोसले याला ताब्यात घेत अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या