राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
अस्तगाव फाटा येथे पत्र्याच्या गाळ्यासमोर झोपलेल्या तिघांना मारहाण करत जबरी चोरी करणार्या आंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास राहाता पोलिसांनी अटक केली. 4 डिसेंबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास अस्तगाव फाटा येथील एका पत्र्याच्या गाळ्यासमोर यातील फिर्यादी व सहकारी झोपेत असताना अज्ञात चार अनोळखी इसमांनी त्यांना दगडाने डोक्यात मारहाण करून जखमी केले. त्यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल व बवाना बंजारा याचे गळातील चांदीची चेन व जीओ कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेऊन निघून गेले. याबाबत राहाता पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. 1-0557/2024 भा. न्या. सं. कलम 309 (6), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपीने दिलेल्या वर्णनावरून सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे शिर्डी, ता. राहाता येथील रहिवाशी असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्याने त्यावरून राहाता पोलीस स्टेशनचे पोसई किरण साळुंके, पोहेकॉ ए. एम. झिने, एस .बी. नरोडे, आर. बी बर्डे, व्ही. बी. पंडोरे, ए. आर गवांदे, एस. आर. मालणकर इरफान शेख, अशोक शिंदे यांनी शिर्डी परिसरात दोन दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार आदेश उर्फ सोनू दत्तात्रय नागरगोजे, रा. शिवाजीनगर शिर्डी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून चोरलेला 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपीच्या साथीदारांची नावे निष्पन्न करण्यात आली असून पोलीस पथक कसोसीने शोध घेत आहे. सदर आरोपींकडून अशा प्रकारे जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.