Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमवर्षभरात 17 सराईत गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबध्द

वर्षभरात 17 सराईत गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबध्द

चार टोळ्यांतील 27 सराईत गुन्हेगारांवर ‘मोका’

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कठोर पाऊल उचलून गेल्या वर्षभरात 17 सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करून त्यांना नाशिकच्या कारागृहात स्थानबध्द केले. तसेच चार टोळ्यांतील 27 गुन्हेगारांवर ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालुका, एमआयडीसी तसेच सुपा, श्रीगोंदा, बेलवंडी, जामखेड, संगमनेर शहर, आश्वी, शिर्डी, कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत 17 गुन्हेगारांकडून वाळू तस्करी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासह अग्निशस्त्र व घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, शासकीय कामात अडथळा निर्माण असे गंभीर गुन्हे केले जात होते. त्यांनी सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणली होती.

- Advertisement -

दरम्यान, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुर्‍या व कूचकामी ठरत होत्या. त्यावर त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत अधिक्षक ओला, यांना सादर केला होते. सदर प्रस्तावांची अधिक्षक ओला यांनी बारकाईने छानणी व पडताळणी करून सदरचे प्रस्ताव शिफारस अहवालासह जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे पाठविले. त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 17 गुन्हेगारांना एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबध्द केले आहे.
तसेच सन 2024 मध्ये संघटीतपणे टोळीने गैर कायद्याची मंडळी जमवून अग्निशस्त्रासह खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, चोरी, जबरी चोरी करणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अग्निशस्त्र, घातकशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या चार टोळ्यांविरूध्द मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये लोणी येथील अमर बाळू भोसले, पारनेर येथील मिथुन उंबर्‍या काळे तसेच निघोज (ता. पारनेर) येथील जत्रा हॉटेलवर जेवणाच्या बिलाच्या कारणावरून तलवार, लाकडी दांडके व कोयत्याने गंभीर जखमी करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या सागर उर्र्‍फ धोंड्या महादु जाधव याची टोळी व तिसगाव (ता. पाथर्डी) येथील मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांची हत्या करणारे उमेश रोशन भोसले याच्या टोळींचा समावेश आहे. या चार टोळ्यांतील 27 सराईत गुन्हेगारांविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन 1999 च्या कलमांतर्गत प्रस्ताव तयार करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे पाठविले होते. त्यांनी या टोळ्यांवर मोका कायद्यान्वये कारवाई केली आहे. गेल्या वर्षभर अधिक्षक ओला यांनी गुन्हेगारांवर केलेल्या या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...