Tuesday, March 25, 2025
HomeनगरCrop Competition : कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी पीक स्पर्धा; भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी

Crop Competition : कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी पीक स्पर्धा; भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येतील.

- Advertisement -

जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्‍यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकर्‍यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी 300 रूपये व आदिवासी गटासाठी 150 रूपये असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्‍याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणार्‍या शेतकर्‍याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणार्‍या शेतकर्‍याच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकर्‍यांसाठी तालुका पातळीवर 5 हजार, 3 हजार व 2 हजार रूपये असे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस असेल. जिल्हा पातळीवर 10 हजार, 7 हजार व 5 हजार रूपये तर राज्यपातळीवर प्रथम 50 हजार द्वितीय 40 हजार तसेच तृतीय 30 हजार रूपये बक्षीस असेल.

अर्जासोबत जोडा कागदपत्रे

पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येत आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ (अ) चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), स्पर्धेसाठी शेतकर्‍याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आदी कागदपत्रे जोडावी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...