Friday, May 3, 2024
Homeजळगावपीकविमा नोंदणीकडे शेतकर्‍यांचा कानाडोळा

पीकविमा नोंदणीकडे शेतकर्‍यांचा कानाडोळा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात अवकाळी पाउस, गारपीट, वादळी वार्‍यामुळे होणार्‍या कृषि उत्पादन शेतमालाचे पिकाची आर्थिक नुकसानीपासून बचाव व्हावा यासाठी केन्द्र व राज्य शासनांतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी केली जाते.

- Advertisement -

दरवर्षी पिक कर्ज वाटपासोबतच शेतकर्‍यांकडून पिकविमा रकमेची वेळीच कपात केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांच्या आर्थीक नुकसानीची भरपाई पिक विमा योजनेव्दारा देण्यात येते.

परंंतु यावर्षी जिल्हयातील सरासरी शेतकरी लोकसंख्येच्या मानाने केवळ 1 लाख 58 हजार740 शेतकर्‍यांनी एक लाख 52हजार 175.53 हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी विमा नोंदणी केली आहे. त्यापैकी 52 हजार शेतकर्‍यांनी 12 कोटी रकमेचा पिकविमा जिल्हा बँकेमार्फत घेतला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

कृषि उत्पादीत शेतमालाचे नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान होउ नये यासाठी यंदा भारती अ‍ॅक्सा जनरल इन्शरन्स कंपनी मुंबई यांचेतर्फे अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना राज्य तसेच केंद्र शासनाकडून विमा संरक्षीत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते.

पिक विमा योजना ऐच्छिक असून यंदा कोरोना साथरोग प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनां अंमलबजावणी करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या