Saturday, July 27, 2024
Homeनगरपीक विमा योजनेतून मिळणार नुकसान भरपाई

पीक विमा योजनेतून मिळणार नुकसान भरपाई

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सलग तीन आठवडे म्हणजेच 21 दिवसांचा पावसाचा खंड पडला असेल व शेतकर्‍यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये अधिसूचित पिकाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकर्‍यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम विमा स्वरूपात देण्यात येते. यामध्ये राहाता तालुक्यातील पाचही मंडळांत 21 दिवसांचा खंड पडल्याने सर्वच तालुक्यांचा समावेश झाला असून येत्या दोन दिवसांत अहवाल पूर्ण करून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी दिली.

- Advertisement -

खरीप 2023 मध्ये एक रुपयात पीक विमा योजने अंतर्गत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात राहाता तालुक्यात जवळपास 47 हजार विक्रमी शेतकर्‍यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. चालू वर्षी जुलै ऑगस्ट दरम्यान पावसाचा मोठा खंड पडल्याने कोरडवाहू पिके गेल्यात जमा आहेत.पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, मका, बाजरी पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने पीक विमा भरलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नुकसान भरपाई ठरवण्यासाठी तालुकास्तरावर विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी सहाय्यक व तलाठी असे राज्य शासनाचे अधिकारी यांची समिती स्थापन केली आहे. सदर समिती अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी रँडम पाच टक्के क्षेत्राचे नजर अंदाज सर्वेक्षण करून नुकसानीचे मूल्यमापन करून नुकसानीची टक्केवारी निश्चित करणार आहे.

हा अंदाज पूर्ण महसूल मंडळाला लागू असणार आहे. यावर्षी खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे व पावसाचा 21 दिवसांचा खंड पडल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाईमध्ये राहाता तालुक्यातील राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर व पुणतांबा या पाचही मंडळांचा समावेश झाला आहे.पाचही महसूल मंडळातील खरीप पिकांच्या नुकसानी बाबतचा अहवाल येत्या दोन दिवसांत पूर्ण करून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती राहाता तालुका कृषी अधिकारी श्री.आबासाहेब भोरे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या