Sunday, June 23, 2024
Homeजळगावनांद्रा, वावडदा, सावखेड्यात शॉर्टसर्किटमुळेे पिकांना आग

नांद्रा, वावडदा, सावखेड्यात शॉर्टसर्किटमुळेे पिकांना आग

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील नांद्रा शिवारातील शेतात झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे (short circuit) शेतातील (field) मका, मक्याचा चारा, (Maize, Maize Fodder,) पीव्हीसी पाईप (PVC pipe)आणि ठिंबक नळ्या तर सावखेडा खुर्द शिवारात विद्युत तार पडून केळीचे पिक (Banana crop) जळून खाक (burn up) झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?

जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील रहिवाशी शालीग्राम भाऊलाल पाटील (वय-71) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे नांद्रा शिवारात 8 बिगे शेती आहे. या शेतात त्यांनी मका लावलेला होता. काही दिवसांपुर्वीच त्यांनी मका कापून ठेवलेला होता. शुक्रवारी 12 मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे शालीग्राम पाटील यांच्या शेतातील मक्याला आग लागली. या आगीत शेतातील मका, मक्याचा चारा, बांधावर ठेवलेलेल्या ठिंबक नळ्या संपुर्ण जळून खाक झाले आहे.

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

तसेच शेजारील शेतकरी किरण पंजाबराव पाटील यांच्या शेतातील ठिंबक नळ्या आणि बंटी रमेश पाटील यांच्या शेतात असलेला मक्याचा चारा जळून खाक झाला आहे. या आगीत अंदाजे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी पोलीस अकस्मात आगीची नोंद करण्यात आलेली आहे.

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

भरपाई मिळावी

शुक्रवारी दिवसभरात विद्युत वाहिनी तुटून व शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत चार शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी अवकाळी पाऊसामुळे हवालदिल झाला आहे, त्याच आगीमुळे त्याचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

वायर तुटून लागली केळीला आग

जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे नामदेव यादव पाटील (वय-70) हे वास्तव्यास आहेत. त्यांची सावखेडा खुर्द शिवारात गट नंबर 150 या ठिकाणी शेती आहे. शुक्रवार दि. 12 मे रोजी या शेतावरून गेलेली महावितरणचे विजेची तार अचानक तुटून शेतात पडली.

त्यामुळे शेतात आग लागल्याने शेतातील उभ्या केळीचे पीक जळून खाक झाले तसेच शेतातील ठिबकच्या नळ्याचे सुद्धा खाक होवून नुकसान झाले आहे. या आगीमुळे एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकाराबाबत शेतमालक नामदेव यादव पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील हे करीत आहे.

चोरून काढलेल्या फोटोंचा गैरफायदा : अत्याचार करीत विवाहितेला केले गरोदर

दोन एकरावरील ऊस जळून खाक

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील शेतकरी जानकीराम फकीरा पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. हा ऊस रसवंती करता वापरला जातो. शनिवारी दि. 13 मे रोजी जानकीराम फकीरा पाटील हे शेतात असताना अचानक झालेल्या शार्कसर्किटमुळे ऊसाला आग लागली. या आगीत 2 एकर ऊस जळून खाक झाला असून जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी जानकीराम पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या