नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील विविध राज्यांतील पाकिस्तानी हेरांचा पर्दाफाश होत आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) सहाय्यक उपनिरीक्षकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव मोती राम जाट असून त्याला पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०२३ पासून तो हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हंटले जात आहे.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) दिलेल्या माहितीनुसार, जवान मोती राट हा २०२३ पासून पाकिस्तानी हँडलर्सना राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय माहिती शेअर करत होता. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. गोपनीय माहितीच्या बदल्यात त्याला विविध माध्यमांद्वारे निधी मिळत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनआयएच्या कारवाईनंतर मोतीराम जाटला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
मोती राम जाट याला पाकिस्तानला देशातील संवदेशनील आणि गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असून पाटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयासमोर त्याला सादर करण्यात आले. न्यायालायने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
नियमांचे उल्लंघन अन् हेरगिरीचा पर्दफाश
मोती राम जाट याच्या हालचाली संशयास्पद होत्या. यामुळे सीआरपीएफ कर्मचाऱ्यांनी केंद्रीय तपास संस्थांशी समन्वय साधून त्याच्या सोशल मीडियावरील संदेशाची तपासणी केली. यावेळी त्याने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले, पुढील चौकशीसाठी त्याला राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आले. सीआरपीएफ नियमानुसा त्याा २१.०५.२०२५ पासून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे,” असे सीआरपीएफने म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूर या भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाली असल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले होते. त्यानंतर तपास संस्थांनी पाकिस्तानसाठी भारतात हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली आत्तापर्यंत १९ जणांना अटक केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा