Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशकच्च्या तेलाचे दर १३० डॉलर प्रति बॅरलवर; भारतात पुन्हा महाग होणार पेट्रोल-डिझेल?

कच्च्या तेलाचे दर १३० डॉलर प्रति बॅरलवर; भारतात पुन्हा महाग होणार पेट्रोल-डिझेल?

दिल्ली | Delhi

रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) अद्यापही सुरू आहेत. रशियाकडून मागील १२ दिवस युक्रेनवर हल्ला केले जात आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या बॉम्ब हल्ले, गोळीबारात सामान्यजणांचे हाल होत आहेत.

- Advertisement -

या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला (world economy) मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र याचा फटका हा जवळपास जगातील सर्वच देशांना बसत आहे.

Hina Khan : हिनाचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ

रशिया हा कच्च्या तेलाचा (Crude oil prices) सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रशियावर निर्बंध लादण्यात आल्याने अनेक देशांना होणारा कच्च्या तेलाचा (Crude oil) पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर आता १३० डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत.

यापूर्वी कच्च्या तेलाने २०१२ मध्ये पहिल्यांदा १२८ डाॅलरचा आकडा गाठला होता. कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकावर पोहोचल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price in india) किंमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १० मार्च रोजी निवडणूक निकालानंतर पेट्रोलचे दर वाढू शकतात.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

भारतात गेल्या १२४ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, तर कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारत सरकारचा आयातीचा खर्चही वाढत आहे. कारण देशात ७५ % पेक्षा जास्त कच्चे तेल आयात केले जाते.

IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ संघात होणार पहिला सामना

- Advertisment -

ताज्या बातम्या