Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकमशागत पूर्ण; बळीराजाला पावसाची ओढ

मशागत पूर्ण; बळीराजाला पावसाची ओढ

माळेगाव । वार्ताहर Malegaon

पेठ तालुक्यातील सर्वच ठिकाणी बळीराजाला पावसाची ओढ लागल्याने खरीप हंगामातील मशागतीच्या कामे पूर्ण झाली आहे.

- Advertisement -

यंदा जून महिना अर्धा संपला तरी पावसाने अद्यापही पेठ तालुक्यात हजेरी लावलेली नाही. पेठ तालुक्यातील शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मृग नक्षत्राचा पाऊस पेठ तालुक्यात नेहमीच जोरदार हजेरी लावत असतो. परंतु हे नक्षत्र सुरू होऊनही महिना संपत आला तरी पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. मागील वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला दमदार पावसाने पेठ तालुक्यात हजेरी लावली होती. त्यामुळे तालुक्यातील खरीप हंगामाला बळीराजाने जोरदार सुरुवात केली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती हंगामाला जोर आला होता.

गेल्यावर्षी मोठा खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात बळीराजाला पावला होता; परंतु यंदा जून महिना संपत आल्याने पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने बळीराजा चिंतेत दिसत आहे. बळीराजासमोर आर्थिक संकट उभे असल्याचे दिसत आहे. सध्या तरी पेठ तालुक्यातील सर्वच ठिकाणी खरीप पेरणीची जोरदार सुरुवात दिसून येत आहे.

परंतु जून महिना संपत आला असून पावसाने हजेरी न लावल्याने खरीप हंगामावर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. पावसाबाबत हवामान विभागाच्या महत्त्वाच्या सूचना गेल्या काही दिवसांपासून बळीराजा बघत आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने महाराष्ट्रात किंवा तालुक्यात हजेरी न लावल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या