Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशभारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात?RBI ने केली मोठी घोषणा

भारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात?RBI ने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशात डिजिटल रुपयाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डिजिटल रुपयांचा पायलट प्रोजेक्ट आरबीआय लवकरच सुरू करू शकते. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऑक्टोबरपर्यंत आंतरबँक कर्ज किंवा कॉल मनी मार्केटमधील व्यवहारांसाठी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया बाजारात आणू शकते. सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली.

१ नोव्हेंबर २०२२ रोजी होलसेल सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC)रोजी लाँच करण्यात आले. त्याचा वापर सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहारांच्या निपटारापुरता मर्यादित होता.”रिझर्व्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात कॉल मार्केटमध्ये घाऊक सीबीडीसीऑफर करेल, असे चौधरी यांनी जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेवेळी सांगितले. वित्त विधेयक, २०२२ मंजूर झाल्यामुळे, RBI कायदा, १९३४ च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

RBI ने सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) च्या पायलट प्रोजेक्टसाठी नऊ बँकांची निवड केली आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. तसेच देशातील प्रसिद्ध आणि मोठ्या बँकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँकआयसीआयसीआय बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे.

डिजिटल रुपया खरेदी करण्यासाठी वरीलपैकी कोणत्याही एका बँकेच्या वेबसाइटवर किंवा या बँकांच्या ॲपवर जाऊन ई-रुपया वॉलेट वापरण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. सीबीडीसी किंवा ई-रुपया हे रिझर्व्ह बँकेने दिलेले सार्वभौम चलन आहे.

डिजिटल रुपया हा मध्यवर्ती बँकेने बाजारात आणलेला आहे. त्यामुळे तो आभासी चलनाप्रमाणे बेभरवशी नाही.गरज भासल्यास ई-रुपया प्रत्यक्ष रुपयात सहजगत्या रूपांतरित करता येतो. हे एक लवचीक चलन आहे. ही करन्सी फाडून टाकता येत नाही. त्याचे आगीसारख्या संकटातून बचाव होतो. तुम्हाला ई-रुपयाला दुसऱ्या कोणत्याही ई-चलनासमोर बदलता येत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या