Monday, June 24, 2024
Homeक्राईमNashik Crime News : 'ओएलएक्स'वर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

Nashik Crime News : ‘ओएलएक्स’वर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

क्यूआर काेडचा झाेल करुन गंडविले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

ओएलक्सवर (OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा (QR Code) झोल करुन सायबर टेक्निक वापरुन तब्बल १० लाख रुपये उकळून फसवणूक (Fraud) केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) अनोळखी खरेदीदार व ज्या बँक खात्यांत पैसे वर्ग झाले त्या खातेधारकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सेवानिवृत्तास गुंतवणुक करण्यास भाग पाडून १७ लाख रुपये उकळले

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका महिलेसह दुसऱ्या व्यक्तिने घरातील काहीतरी साहित्य विकण्यासाठी ओएलएक्स वेबसाईटवर साहित्याचे फोटो अपलोड करुन विक्रीची जाहिरात केली. त्यानंतर ९३४३५१०९७१ या मोबाइल क्रमांकावरुन बोलणाऱ्या संशयिताने ५ मे रोजी दोन्ही ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीत संपर्क केला. त्यानंतर दोघांकडील साहित्य खरेदी करण्यात स्वारस्य दाखविले. त्यामुळे आठ ते दहा हजार रुपयांचे साहित्य खरेदी करण्यासाठी संशयितांने क्यूआर कोडचे स्कॅनर दोन्ही ग्राहकांना (Customers) पाठविले आणि त्यांचे मागविले.

हे देखील वाचा : Nashik News : आईचे छत्र हरपल्याने तरुणीची आत्महत्या

त्यातून बोलण्यात गुंतवून ठेवत संशयिताने सायबर टेक्निकचा वापर करुन दोन्ही ग्राहकांना कमी अधिक स्वरुपात पैसे बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. तर, ग्राहकांनी खरेदीदार जे सांगेल, त्यानुसार प्रक्रिया केली. दरम्यान, त्यानंतर संशयितांचा (Suspects) संपर्क होत नसल्याने महिलेसह दुसऱ्या ग्राहकाने सायबर पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर हा प्रकार पाहून पोलिसही चक्रावून गेले. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

- Advertisment -

ताज्या बातम्या