मुंबई | Mumbai
कॉमनवेल्थ गेम्सचा (Commonwealth Games 2022) आठवा दिवस भारतीय कुस्ती पटूंनी आपल्या नावी नोंदवला आहे. कूस्तीमध्ये भारताने एक दोन नाही तर चक्क ६ पदकांची कमाई केली आहे.
यामध्ये तीन सुवर्णपदकांसह (Gold Medal) एक रौप्य पदक (Silver Medal) आणि दोन कांस्य पदकांचा (Bronze Medal) समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहेत. यावर्षी भारताने (India) एकूण पटकावलेल्या पदकांची संख्या आता २६ वर गेली आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia), दीपक पुनिया (Deepak Punia) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर महिला ५७ किलो वजनी गटात कुस्तीपटू अंशू मलिकने (Anshu Malik) रौप्य पदक आपल्या नावी नोंदवलं. एवढचं नाही तर भारताने कुस्तीमध्ये दोन कास्यपदकांची कमाई देखील केली आहे. दिव्या काकरन (Divya Kakran) आणि मोहित ग्रेवाल (Mohit Grewal) हे दोघं कास्य पदकाचे मानकरी ठरले आहेत.
भारताची पदकसंख्या :
९ सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया
८ रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक
९ कांस्य : गुरूराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरभ घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरान, मोहित ग्रेवाल