नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेअर मार्केटमध्ये (Stock Market) आर्थिक गुंतवणूक (Financial investment) केल्यास ट्रेडिंगनुसार जादा परतावा मिळेल, असे अमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ( Cyber Thieves) सेवानिवृत्त व्यक्तिस तब्बल १७ लाख ७५ हजार १०० रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानुसार दाखल फिर्यादीनुसार शहर सायबर पोलीसांत (Police) अनोळखी संशयितांसह ज्या बँक खात्यांत पैसे भरण्यात आले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
याबाबत अधिक माहिती अशी की, ६१ वर्षीय व्यक्ती खासगी कंपनीतून सेवानिवृत्त असून ते घरी असतांना त्यांना १९ मार्च ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान, सायबर चोरट्यांनी व्हाट्सअँप व सोशल मिडिया (Social Media) हँन्डवरुन संपर्क साधला. संशयितांनी संगनमताने सेवानिवृत्त व्यक्तीस सेठी ट्रेटिंग फर्मकडील शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करुन मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी विविध प्रलोभने दाखवून अनेकांना फायदा झाल्याचे कागदपत्रे, फोटो, सोशल मिडीयावर पाठविले. याच अमिषांना भुलून सेवानिवृत्ताने पैसे भरण्यास संमती दर्शविली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी
त्यानुसार 8114547037, 8401771509, 7973057703, 7798313856, 8114546801 व 9257958819 या नंबरवरील व्हॉटसअॅप वापरकर्त्या संशयितांनी सेवानिवृत्तास त्याच्या प्रोफाईलला जादा पैसे वर्ग झाल्याचे दाखवून आणखी पैसे भरण्यास प्रवृत्त केले. संशयितांच्या मागणीनुसार तक्रारदार सेवानिवृत्ताने सेठी ट्रेडिंग फर्म (बँक खाते नंबर PUNB0148410), पराग ट्रेडर्सचे बँक खाते क्र (INDB0000143) आणि वॅनेक्स ओरिजीनच्या बँक खाते क्र(PUNB0092010) वर एकूण १७ लाख ७५ हजार रुपये वर्ग केले. मात्र, भरलेल्या पैशांचा परतावा मिळत नसल्याचे समजल्यावर त्यांनी चौकशी केली. त्यात आपली फसवणूक झाल्याचे कळताच सेवानिवृत्ताने सायबर पोलीस ठाणे (Cyber Police Station) गाठून कैफियत मांडली. त्यानुसार वरील संशयितांसह बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : माजी आयपीएस सासऱ्याला सुनेची धमकी; मागितली वीस लाखांची खंडणी