Monday, June 24, 2024
Homeक्राईमNashik Crime News : ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

Nashik Crime News : ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार (Malfeasance) झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) लुटल्याची घटना घडली आहे. तसेच कारवाईची भीती दाखवित ज्येष्ठ नागरिकाकडून सात लाख रुपयांची वसुली केल्याचा प्रकारही उघड झाला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी (Cyber Police) गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाचा खून

याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूर रस्त्यावरील रहिवाशी श्रीकांत गजेंद्र शिंदे (वय ६१) यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मोबाइल क्रमांक धारकांसह एका खासगी बँक खातेधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. दरम्यान, शिंदे यांना २१ मार्च रोजी संशयितांनी फोन केला. ‘तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन एक बँक खाते उघडण्यात आले.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदे २०१३ सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

त्यावरुन खासगी बँकेत सहा कोटी आठ लाखांचा गैरव्यवहार करण्यात आला. त्यामुळे तुमच्याविरुद्ध कारवाई (Action)करावी लागणार आहे. कारवाई व्हावी, असे वाटत नसल्यास सात लाख रुपये द्यावे’, अशी मागणी करण्यात आली. घाबरलेल्या व्यावसायिकाने संबंधितांच्या मोबाइल क्रमांकावर सात लाख ३७ हजार रुपये जमा केले. त्यानंतर अधिक माहिती घेतल्यावर ही फसवणूक असल्याचे उघड झाले. त्यामुळे शिंदे यांनी पोलिसांत धाव घेतली.

विविध शासकीय यंत्रणांच्या नावे बनावट फोन करुन कारवाईची धमकी देत नागरिकांना फसविण्यात येत आहे. कारवाई टाळण्याचा दावा करुन पैश्यांची मागणी करण्यात येते. या स्वरुपाचे फोन आल्यास, त्याची खातरजमा करावी. तसेच सायबर पोलिसांत अर्ज करावा.

-रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर
- Advertisment -

ताज्या बातम्या