Sunday, September 8, 2024
HomeनाशिकNashik News : "खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत"; तातडीने पंचनामा करण्याचे मंत्री...

Nashik News : “खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत”; तातडीने पंचनामा करण्याचे मंत्री भुसेंचे निर्देश

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची केली पाहणी

नाशिक | Nashik

जिल्ह्यात अवकाळी आणि पूर्व मोसमी वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात देवळा तालुक्यातील (Deola Taluka) उमराणे (Umrane) येथील अनुप पवार यांचे कांदा शेडचे नुकसान झाले तर शेड कोसळून देविदास अहिरे यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यानंतर आज सकाळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तातडीने पंचनामा करून मदत पोहचविण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.

- Advertisement -

यावेळी भुसे म्हणाले की, “खचून जावू नका शेतकऱ्यांसोबत सरकार खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करू. यंत्रणेला सूचना दिली असून लवकरात लवकर मदत राज्य शासनातर्फे करण्यात येईल. वादळाचा अंदाज घेवून नागरिकांनी काळजी घ्यावी”, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शासकीय यंत्रणेला (Government System) देखील सतर्क राहण्याच्या सूचना भुसे यांनी केल्या आहेत.

त्याबरोबरच उमराणे येथील कांदा शेड (Onion Shed) कोसळून देवीदास भाऊराव अहिरे (वय ४०) रा. तिसगाव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर गायत्री सूरज देवरे (वय २२) व अभय अजय देवरे (वय साडे तीन वर्षे) हे जखमी आहेत. या वादळात उमराणे येथे बहुतांश कांदा शेड व घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, उमराणे व तिसगाव परिसरात रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे जीवित हानी आणि अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आर्थिक नुकसान झाले असून, मुंबई आग्रा महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली. यात वीजपुरवठा खंडित झाला आहे. यावेळी प्रशासनाला यंत्रणा राबवून तातडीने वीजपुरवठा तसेच सर्व पूर्ववत करण्याची सूचना मंत्री भुसे यांनी दिली आहे. याशिवाय प्रशासकीय यंत्रणेसह मंत्री भुसे यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानाची पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या